सर्व भारतीयांसाठी मोठी खुशखबर असून चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागावर 6 वाजून 4 मिनिटांनी उतरले आहे, जिथे याआधी जगातील कोणत्याही देशाला उपग्रह उतरवण्यात यश आलेले नाही.
40 दिवसांच्या प्रवासानंतर 14 जुलै रोजी दुपारी 2:35 वाजता श्रीहरिकोटा येथून झेप घेतलेले चांद्रयान-3 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:04 वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ 70 अंश अक्षांश जवळ उतरले आहे.
चांद्रयान-2 च्या लँडिंग दरम्यान तांत्रिक बिघाड लक्षात घेऊन, चांद्रयान-3 अधिक कार्यक्षम बनवण्यात आले होते. याबाबतची मोठी मोहीम इस्रोने हाती घेतली होती. चांद्रयान 3 यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.