मुंबई : सहकारनामा ऑनलाइन
राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत स्वतः फडणवीस यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे. पुढे त्यांनी लिहिताना आपण कोरोनाची साथ आल्यापासून दिवसरात्र काम करतो आहे. मात्र आता मी थांबावे असे परमेश्वराला वाटत असेल. माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून मी आता क्वारंटाईन होत आहे असं फडणवीस यांनी सांगितलं असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी ट्वीटर वरुन सांगितले की लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही दिवस आराम घेतला पाहिजे असे शारीरिक संकेत दिसत आहेत. त्यात माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.