Categories: Previos News

Breaking News : केडगावचे सबरजिस्ट्रार ऑफिस फोडले, इतक्या साहित्याची चोरी



दौंड : सहकारनामा 

दौंड तालुक्यातील केडगाव येथे असणारे सबरजिस्ट्रार ऑफिस अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

यावेळी चोरट्यांनी या सबरजिस्ट्रार ऑफिसमधील महत्वाचा ऑफिशियल लॅपटॉप चोरून नेल्याची माहिती मिळत असून यवत पोलीस ठाण्यात याबाबत दुय्यम निबंधक अधिकारी गुजार यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.



केडगाव हे दौंड तालुक्यातील प्रमुख गाव असून या गावामध्ये (बोरीपार्धी हद्दीमध्ये) हे सबरजिस्ट्रार ऑफिस आहे. चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास या सब रजिस्ट्रार ऑफिसचा दरवाजा कुठल्यातरी हत्याराच्या साहाय्याने तोडून आत प्रवेश करत आतील महत्वाच्या ऑफिशियल कामाचा लॅपटॉप चोरून नेल्याची घटना घडली आहे.

या घटनेची माहिती मिळताच यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी आपल्या पोलीस पथकासह भेट देऊन तपासाची सूत्रे हलवली आहेत. या शासकीय कार्यायातील चोरी करणारे चोर लवकरच पकडले जातील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Sahkarnama

Recent Posts

श्री विठ्ठल विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी ‘संतोष देशमुख’ तर व्हा.चेअरमनपदी ‘प्रविण मोरे’ यांची बिनविरोध निवड

श्री विठ्ठल विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी ‘संतोष देशमुख’ तर व्हा.चेअरमनपदी ‘प्रविण मोरे’

4 तास ago

भीमा पाटस कारखान्याची ‘सत्य’ परिस्थिती आली समोर | आरोप करणारे निरुत्तर.. आ.‘राहुल कुल’ यांच्या ‘त्या’ कृतीची सर्वत्र चर्चा

भीमा पाटस कारखान्याची सत्य परिस्थिती आली समोर | आरोप करणारे निरुत्तर.. ‘राहुल कुल’ यांच्या ‘त्या’…

2 दिवस ago

दौंड मध्ये पहिल्यांदाच कर्णबधिर विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

दौंड मध्ये पहिल्यांदाच कर्णबधिर विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

2 दिवस ago

‘ते’ विधान नंदू पवार यांच्याबद्दल नव्हतेच, ‘कुल’ कुटुंबाने त्यांचा कायम आदरच केला आहे – बाळासाहेब लाटकर

‘ते’ विधान नंदू पवार यांच्याबद्दल नव्हतेच, ‘कुल’ कुटुंबाने त्यांचा कायम आदरच केला आहे - बाळासाहेब…

3 दिवस ago