Categories: Previos News

Breaking News : येरवडा कारागृहातून 5 कैदी फरार, दौंड तालुक्यातील ‛तिघांचा’ समावेश

पुणे : सहकारनामा ऑनलाईन

पुणे शहरात असणाऱ्या आणि अभेद्य समजल्या जाणाऱ्या येरवडा जेल मधून रात्री खिडकीचे गज कापून पाच कैदी फरार झाले आहेत. दौंड तालुक्यातील एका कैद्याचा या कैद्यांमध्ये समावेश असल्याची माहिती जेल पोलिसांनी स्थानिक पोलिसांना दिली असून या प्रकरणी विविध  पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील येरवडा जेलमधून बुधवारी मध्यरात्री 5 कैदी फरार झाले. या कैद्यांमध्ये देवगण चव्हाण, अक्षय चव्हाण, गणेश चव्हाण, अजिंक्य कांबळे आणि सनी पिंटो यांचा समावेश आहे. याबाबत तुरुंग प्रशासनाने माहिती दिली आहे. जेलमध्ये असणाऱ्या 4 क्रमांकाच्या  इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर असणाऱ्या  पाच नंबरच्या खोलीत हे सर्वजण होते. मध्य रात्रीच्या वेळी खिडकीचे गज तोडून ते फरार झाले. घटना घडली त्यावेळी या ठिकाणी रात्रपाळीवर  सहाय्यक पोलीस निरीक्षक सुयश जोशी व नितिन शिंदे हे ड्युटीवर तैनात होते. फरार झालेल्या कैद्यांमध्ये तिघे दौंड तालुक्यातील रहिवासी असून एक हवेली तालुक्याचा तर एक पुणे शहराती राहणारा आहे. त्यांच्या राहण्याच्या ठिकाणानुसार दौंड, लोणी-काळभोर व वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

1 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago