Categories: Previos News

Breaking News – दौंड आणि नारायणगाव येथे रेमिडीसिव्हर इंजेक्शनची काळया बाजाराने विक्री करणारे 3 जण ताब्यात : पुणे ग्रामीण एलसीबी (LCB) पथकाची कामगिरी



| सहकारनामा |

पुणे : पुणे जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना त्यावर उपाचारासाठी म्हणून वापरले जाणारे रेमडेसिव्हीर  (Remdesivir) इंजेक्शनचा काळाबाजार हि वाढला आहे. हा काळाबाजार रोखण्यासाठी पुणे ग्रामिण चे पोलीस अधीक्षक यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

याच अनुषंगाने पुणे जिल्हयात कोरोना उपचारासाठी वापरण्यात येणारे रेमिडीसिव्हर इंजेक्शनची काळया बाजाराने शासनाने ठरवून दिलेल्या किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री होत असल्याची माहिती त्यांनी पोलिसांनी काढून कारवाई करणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना आदेश दिलेले होते.

त्यानुसार पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने दौड व वारुळवाडी नारायणगाव ता.जुन्नर अशा दोन ठिकाणी रेमिडीसिव्हर इंजेक्शनची काळया बाजाराने विक्री करणारे तिन आरोपींना ताब्यात घेवून त्यांचेकडून एकूण ६ रेमिडीसिव्हर इंजेक्शन व इतर मुद्देमाल असा एकूण किंमत रुपये १,१९,७६९/- चा माल जप्त केलेला आहे.

दौंड शहराच्या हद्दीत हुतात्मा चौक, गणपती मंदिरासमोर ता.दौंड जि.पुणे येथे अक्षय राजेश सोनवणे (वय २४ वर्षे रा.गांधी चौक, विठ्ठल मंदिराचे मागे, दौंड ता.दौंड जि.पुणे) सुरज संजय साबळे (वय २३ वर्षे रा.शालिमार चौक, स्वामी समर्थ मंदिरावे मागे, दौंड ता.दौंड जि.पुणे) हे दोघेजण रेमिडीसिव्हर इंजेक्शन प्रत्येकी ३२हजार रुपयांना एक असे विक्री करीत असताना मिळून आले. त्यांचे ताब्यातून ३ रेमिडीसिव्हर इंजेक्शन कि.उ.७,८७९/-, दोन मोबाईल, कि.रु.२० हजार/- व होंडा अॅक्टीव्हा दुचाकी किं.रु.७०,हजार असे एकूण ९७,८७९/-रु.चा माल जप्त करण्यात आला.

तर दुसरी कारवाई नारायणगावजवळील मौजे वारुळवाडी ता.जुन्नर राजाराम सबनिस विदयालयासमोर ता.जुन्नर जि.पुणे येथे रोहन शेखर गणेशकर (वय २९ वर्षे रा.वाणेवाडी पो.आपटाळे ता.जुन्नर जि.पुणे) येथे ३ रेमिडीसिव्हर इंजेक्शन

प्रत्येकी ४५ हजार रुपयाला एक असे विक्री करीत असताना मिळून आला. त्याच्या ताब्यातून ३ रेमिडीसिव्हर इंजेक्शन

कि.रु.११,८९०/- व मोबाईल कि.रु.१० हजार सह एकूण २१,८९०/-रु.चा माल जप्त करण्यात आला.

कोविड-१९ या साथीच्या आजाराचे औषध म्हणून वापरण्यात येणारे रेमिडीसिव्हर इंजेक्शन बेकायदेशीररित्या,

अवैध व गैर मार्गाने मिळवून ते काळया बाजाराने स्वतःचे अर्थिक फायदयासाठी कोणताही परवाना नसताना विकी

करणेसाठी जवळ बाळगून औषध विक्रेते नसतानाही खुल्या बाजारात उपलब्ध असलेल्या उत्पादकाने ठरविलेल्या एम.

आर.पी. पेक्षा जास्त चढया बाजाराने विक्री करताना व विकत घेताना मिळून आलेने दोघे आरोपींवर दौड पोलीस

स्टेशनला व एका आरोपीवर नारायणगाव पोलीस स्टेशनला औषध किंमत नियंत्रण आदेश २०१३ सह वाचन कलम

३(२)(सी), जिवनाश्यक वस्तु अधिनियम १९५५ चे कलम ७(१)(ए)(ii), औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० चे कलम १८(सी), २७(बी)(ii), २८, २२(१ (cca),२२(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, पुणे विभागाचे अपर पोलीस अधीक्षक श्री. विवेक पाटील, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक श्री.मिलींद मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहा.पोलीस निरीक्षक सचिन काळे, पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे, सहा.फौ. शब्बीर पठाण, पोहवा.महेश गायकवाड, पोहवा.निलेश कदम, पोहवा. सचिन गायकवाड, पोहवा.सुभाष राऊत, पोना. गुरु गायकवाड, पोहवा.मुकेश कदम, पोहवा. दत्ता तांबे, पोहवा.सागर चंद्रशेखर, पोहवा. काशिनाथ राजापुरे, पोकॉ.दगडू विरकर यांनी केलेली आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

15 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago