|सहकारनामा|
पुणे : रविवार दि.18 रोजी उरुळी कांचन येथे सुप्रसिद्ध हॉटेल गारवा चे मालक रामदास आखाडे यांच्यावर खुनी हल्ला झाला होता. हल्ल्यानंतर त्यांना तातडीने रूग्णालयात भरती करण्यात आले होते मात्र आज रात्री 12:30 च्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
आखाडे यांच्यावर झालेला हल्ला हा व्यवसायिक स्पर्धेतून झाला की त्यास अजून काही कारण आहे याचा शोध लोणीकाळभोर पोलीस घेत आहेत, मात्र हा हल्ला व्यावसायिक स्पर्धेतून झाला असावा असा कयास लावला जात आहे. रामदास आखाडे यांच्यावर हल्ला करणारे 3 हल्लेखोर होते असा अंदाज लावला जात असून cctv फुटेजमध्ये एक हल्लेखोर थेट हॉटेलच्या बाहेर बसलेल्या आखाडे यांच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी सपासप वार करत असल्याचे दिसत आहे.
उरुळी कांचन येथे गारवा हॉटेल हे सुप्रसिद्ध होते. कमी पैशात उत्कृष्ठ जेवण आणि येणाऱ्या ग्राहकांना आदराची वागणूक हि या हॉटेल ची खासियत होती.