कुरकुंभ : सहकारनामा ऑनलाईन (अलीम सय्यद)
दौंड तालुक्यातील कुरकुंभ परिसरात एक व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉजीटिव्ह आला आहे. कुरकुंभ येथे मोठी औद्योगिक वसाहत असूनही देखील आत्ता पर्यंत येथे एकही कोरोना रुग्ण आढळला नव्हता परंतु आज एक कोरोना रुग्ण आढळल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे.
या परिसरात सध्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना रुग्ण सापडला असला तरीही कुणी घाबरून न जाता योग्य ती काळजी घ्यावी आणि मास्कचा वापर करावा, सॅनिटायजरचा वापर करावा, साबणाने वारंवार हात स्वच्छ धुवावे , गर्दी टाळावी, विनाकारण बाहेर फिरू नये असे आवाहन कुरकुंभ प्राथमिक आरोग्य अधिकारी राजेश पाखरे यांनी केले आहे.