Categories: क्राईम

Breaking… दौंड’मध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, एकास अटक

दौंड : अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून दौंड पोलिसांनी दोघांविरोधात भा.द.वी. 376,363,34 सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी ओंकार संतोष जोगदंड (रा. दौंड) यास पोलिसांनी अटक केली असून या गुन्ह्यामध्ये एका महिलेचाही सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.29 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 6 वा. सुमारास पीडित मुलगी घरी असताना आरोपी ओंकार व त्याची नातलग महिला तेथे आले. त्यांनी या मुलीला कशाची तरी फुस लावून पळवुन नेले. रात्री 10 वा. सुमारास पीडित मुलगी घरी आली असता तिच्या आईने तिला विचारले की ओंकार व महिलेने तुला कोठे नेले होते. तेव्हा तिने सांगितले की त्यांनी मला त्यांच्या घरी नेले व ओंकार याने मी तुझ्याशी लग्न करणार आहे असे सांगून घरातील बेडरूम मध्ये नेले व शारीरिक सुखाची मागणी केली. त्यास नकार दिल्याने त्याने मला मारहाण केली नंतर मी घरी आले.

यावेळी पीडित मुलीने आपल्या आईला पुढे सांगितले की, ऑगस्ट (2022) महिन्यामध्ये आरोपीने तिला लग्नाचे अमिष दाखवून तिच्याशी 2-3 वेळा शारीरिक संबंध ठेवले आहेत. ही घटना मुलीने तिच्या आईला सांगितल्यानंतर तिने दौंड पोलीस ठाण्यात येऊन याबाबत तक्रार दिली. या घटनेचा पुढील तपास पो. उप निरीक्षक राऊत करीत आहेत.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

21 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago