Breaking.. ‘धनगर’ आरक्षण कृती समितीने ‘राधाकृष्ण विखे पाटील’ यांच्या अंगावर ‘भंडारा उधळला’, भाजप आणि धनगर सामाजातील कार्यकर्त्यांमध्ये झाटापट

सोलापूर : मराठा आरक्षण आंदोलन संपूर्ण राज्यात जोर धरत असतानाच आता धनगर समाजही आरक्षणावरून आक्रमक होत असल्याचे दिसत आहे. धनगर समाजाला आरक्षण दिले जात नसल्याने सोलापूरमध्ये धनगर सामाजातील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सोलापूर येथील शासकीय विश्राम गृहात एक मोठी घडामोड घडली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी भंडारा उधळून निषेध केला आहे.

https://youtu.be/UqX8jrvpzMk?si=9m–18naekPkXAjq
पहा व्हिडीओ

मिळत असलेल्या माहितीनुसार धनगर आरक्षण कृती समितीचे काही कार्यकर्ते हे विखे पाटील यांना निवेदन द्यायचे आहे म्हणून त्यांच्या दालनात गेले होते. तेथे अचानक या कार्यकर्त्यांनी विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळत घोषणाबाजी केली आणि धनगर समाजाला आरक्षण द्यावं लागेल असेही सांगिले.

भंडारा उधळल्यानंतर मारहाण.. धनगर कृती समितीच्या कार्यकर्त्यांना यावेळी तेथील एका पक्षाच्या अध्यक्षाने मारहाण केल्याचेही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. धनगर आरक्षण कृती समितीच्या कारकर्त्यांनी विखे पाटलांच्या अंगावर भंडारा उधळताच येथील पदाधिकाऱ्याने त्यांना हाताने, लाथेने मारहाण केली. त्यामुळे आंदोलक अजून चिडलेले दिसले.