Categories: Previos News

Breaking..कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खंडेरायाची सोमवती यात्रा रद्द!

पुरंदर : सहकारनामा ऑनलाईन

संपूर्ण देशामध्ये सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. हिच परिस्थिती राज्यातही आहे. त्यामुळे जेजुरीच्या खंडेरायाची येणारी सोमवती यात्रा रद्द करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय ग्रामस्थ -मानकरी मंडळाकडून घेण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव त्यापासून होणारे  संक्रमण टाळण्यासाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. 

या निर्णयामुळे यंदाच्या यात्रेची पालखीही निघणार नाही त्यामुळे भाविकांनी यात्रेला येऊ नये असे आवाहन करण्यात आलं आहे.

पुरंदर तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे अगोदरच जेजुरी आणि आसपासचा परिसर कन्टेनमेन्ट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. याबाबत जेजुरी पोलिसांनी सोमवती यात्रेनिमित्त कोणीही भाविकांनी शहरात येऊ नये आणि जर असे करताना कोणी दिसले अथवा नियम मोडला तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सहा.पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी यावेळी सांगितले.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

1 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago