BREAKING : यवत पोलिसांचा वाळू माफियांना दणका, 1 कोटी 8 लाख रुपयांचा वाळू उत्खननाचा मुद्देमाल जप्त



दौंड : सहकारनामा ऑनलाइन

दौंड तालुक्यातील खोर, डोंबेवाडी येथे यवत पोलिस आणि महसूल कर्मचाऱ्यांनी अचानक छापा मारून सुमारे 1 कोटी 8 लाख रुपयांचा वाळू उत्खनन करण्याचा मुद्देमाल जप्त केला.



मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 5/11/2020 रोजी यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस स्टेशन येथील सहाय्यक फौजदार लोणकर, पोलीस हवालदार खाडे, पोलीस नाईक निकम, पोलीस कॉन्स्टेबल हेमंत कुंजीर, पोलीस कॉन्स्टेबल सुजित जगताप, पोलीस कॉन्स्टेबल किरण तुपे, पोलीस कॉन्स्टेबल संपत खबाले, पोलीस कॉन्स्टेबल अजित काळे यांसह वरवंड मंडल अधिकारी महेश गायकवाड, तलाठी देवकाते, भांगे, कोतवाल अडसुळ यांना खोर येथे अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार वरील सर्व पोलीस, महसूल पथकाने खोर गावच्या हद्दीतील डोंबेवाडी येथे छापा मारला त्यावेळी तेथे अवैद्य बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या 3 जेसीबी मशीन व 6 वाळू चाळण्याची ट्रॅक्टर यांच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सदर प्रकाराबाबत मंडळ अधीकारी  महेश गायकवाड यांनी यवत पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून सदरची सर्व वाहने यवत  पोलीस स्टेशन येथे जप्त करून लावणेत आली आहेत. सदर गुन्ह्याचा तपास सहा पोलिस निरीक्षक धनंजय कापरे हे करत आहेत