सराईतपणे गुन्हे करणारे दोघेजण 2 वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार

सातारा : सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणारे टोळी प्रमुख १) जयदिप सचिन धनवडे, (वय २२ वर्षे) २) हर्षद संभाजी साळुंखे, (वय २२ वर्षे, दोन्ही रा. क्षेत्रमाहुली ता. जि . सातारा) यांच्या टोळीवर सातारा शहर पोलीस ठाणे येथे खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी करणे, चोरी करणे, खंडणी मागणे, दुखापत पोचवणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सातारा शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम प्रमाणे पूर्ण सातारा जिल्हा, पुणे जिल्ह्यातील भोर, बारामती, पुरंदर तालुक्यातून, सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा, तालुक्यातून, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून दोन वर्षे तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी  नवले (उपविभागीय पोलीस अधिकारी) सातारा भाग सातारा यांनी केली होती.

चोर पोलिसांचा थरार..

सदर टोळीतील इसमांवर दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करुनही गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही. या टोळीमधील इसम हे सातारा शहर तसेच परिसरामध्ये सातत्याने गुन्हे करीत होते. त्यांचेवर कायद्याचा कोणताच धाक न राहील्यामुळे सातारा शहर परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता.

अशा टोळीवर जनतेमधून कडक कारवाई करण्याची मागणी होत होती. वरील टोळीला हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख यांच्यासमोर सुनावणी होवुन सदर टोळीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये पूर्ण सातारा जिल्हा, पुणे जिल्ह्यातील भोर, बारामती, पुरंदर तालुक्यातून, सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा, तालुक्यातून, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश दिला आहे.

नोव्हेंबर २०२२ पासून मपोकाक ५५ प्रमाणे ३० उपद्रवी टोळ्यांमधील ९६ इसमांना, मपोकाक ५६ प्रमाणे २८ इसमांना, मपोकाक ५७ प्रमाणे ३ इसमांना असे एकुण १२७ इसमांविरुध्द तडीपार सारखी कारवाई करण्यात आली आहे . एमपीडीए कायद्याअंतर्गत एका इसमावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे . भविष्यातही सातारा जिल्ह्यामधील सराईत गुन्हेगारांविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करण्यात येणार आहेत.

या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने श्री.अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.हवा प्रमोद सावंत, अमित सपकाळ, पो.कॉ. केतन शिंदे, म.पो.कॉ. अनुराधा सणस, सातारा शहर पोलीस ठाणेचे पोहवा दिपक इंगवले, संदीप पवार, पोकों अमोल सापते यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

12 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago