Categories: क्राईम

पारगाव येथील भीमा नदीत पात्रात आज पुन्हा 7 वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला, मृतांची संख्या 5 वर पोहोचली

दौंड : पारगाव (सालू-मालू ता.दौंड) येथील भीमा नदी पात्रात एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह सापडल्यानंतर आता पुन्हा एकदा 7 वर्षीय (अंदाजे वय) मुलाचाही मृतदेह आज दि. 24 जानेवारी रोजी दुपारी 1:00 वाजण्याच्या सुमारास सापडला असल्याने दौंड आणि शिरूर तालुक्यात एकच खळबळ माजली आहे.

या नदीपात्रात अजूनही दोन लहान मुलांचे मृतदेह असण्याची भीती व्यक्त केली जात असून या सर्व मृतदेहांची ओळख त्यांच्या नातेवाईकांकडून पटली आहे. यात मोहन उत्तम पवार (अंदाजे वय 50 वर्षे) संगीता मोहन पवार (अंदाजे वय 45 वर्षे, दोघे रा.खामगांव ता.गेवराई) त्यांचे जावई शामराव पंडित फुलवरे (अंदाजे वय 32 वर्षे) त्यांची पत्नी राणी शामराव फुलवरे (अंदाजे वय 27 वर्षे, दोघे रा.येळम जि.बीड) यांचे मृतदेह काल सापडले होते आज पुन्हा शामराव फुलवरे यांचा मुलगा रितेश शामराव फुलवरे (वय अंदाजे 7 वर्षे) याचाही मृतदेह सापडला असल्याने मृतांची संख्या 5 वर पोहोचली आहे.

या सर्व प्रकाराणे दौंड तालुक्यात मोठी खळबळ माजली असून रितेश याचे दोन लहान भाऊ छोटू (वय अंदाजे 5 वर्षे आणि कृष्णा वय अंदाजे साडेतीन वर्षे) या दोन मुलांचे मृतदेह हि या नदीपात्रात असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हा अपघात आहे, घातपात आहे कि आत्महत्या हे लवकरच पोलीस तपासात उघड होणार असून एकाच कुटुंबातील 5 लोकांचे मृतदेह पाहून संपूर्ण दौंड तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

19 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago