| सहकारनामा |
दौंड : दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा येथे आज आयोजित रक्तदान शिबिराला (Blood Donation Camp) उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात जवळपास 100 बॅगा रक्तदान करण्यात आले तर 10 अँटीबॉडी तपासण्यात आल्या.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते वैभव सरनोत यांनी माहिती देताना एखाद्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करतो आणि ती गोष्ट आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी होते तेव्हा मिळणार समाधान हे आपण शब्दबध्द करू शकत नाही असे सांगितले.
आणि फक्त ४८ तासांच्या शॉर्ट नोटीसवर देऊळगावगाडा गावचे रक्तदान शिबीराचे नियोजन होऊन या शिबीरात जवळपास 100 बॅगाच्या आसपास रक्तदान (Blood Donation Camp) आणि 10 अँन्टीबॉडी चेकअप होणं ही खरच अभिमानास्पद कामगीरी असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
अवघी काही हजार लोकसंख्या असलेल्या गावात एवढे यशस्वी शिबीर घेणं हे कौतुकास्पद आहे. यासाठी युवा सरपंच विशाल बारवकर, युवा ग्रामपंचायत सदस्य अक्षय बारवकर आणि त्यांची सर्व युवा टिम ने यात चांगले योगदान दिले.