Blood donation : कासुर्डी ग्रामस्थांच्या वतीने 30 एप्रिल रोजी भव्य रक्तदान शिबीर



| सहकारनामा |

दौंड : 

कासुर्डी ग्रामस्थ व कोविड हेल्पसेंटर दौंड यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर  दिनांक 30 एप्रिल 2021 रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कासुर्डी गावठाण येथे आयोजित करण्यात आले आहे.

 सध्याच्या परिस्थितीत संपुर्ण राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. व एक मे पासुन १८ ते ४५ वयोगटातील सर्वांना कोविड लसीकरण होणार आहे. त्यामुळे रक्ताचा तुटवडा मोठया प्रमाणात जाणवु शकतो.  त्यामुळे कासुर्डी ग्रामस्थ व कोविड हेल्पसेंटर दौंड यांनी पुढाकार घेऊन भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून सर्व रक्तदात्यांस रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.

दिनांक ३० एप्रिल २०२१ रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कासुर्डी गावठाण या ठिकाणी या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. 

तरी कासुर्डी गावातील सर्व ग्रामस्थांनी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी रक्तदान करावे. रक्तदान १८ ते ४५ वयोगटातील महिला आणि पुरुष सर्वांना रक्तदान करता येईल ४५ च्या पुढील लस  घेतलेल्या ग्रामस्थांना ५६ दिवस रक्तदान करता येत नाही. व एक मे नंतर १८ ते ४५ वयोगटातील सर्वांना कोविड लसीकरण होणार आहे त्यामुळे नंतर दोन ते तीन महिने रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे आपल्या संपूर्ण राज्यामध्ये रक्ताचा तुटवडा जाणवु नये. यासाठी कासुर्डी ग्रामस्थ व कोविड हेल्पसेंटर दौंड च्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात आपण सहभागी होऊन रक्तदान करावे. 

प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र  व आयोजकांच्या वतीने एक थंड पाण्याचा जार भेट म्हणुन दिला जाईल व ज्या रक्तदात्यास भेट वस्तू घ्यायची नसेल त्याच्या कुटुंबामध्ये एक वर्षभरामध्ये कधी रक्त लागले तरी एक बॅग मोफत दिली जाईल. रक्तदान शिबिराच्या ठिकाणी कोविड १९ च्या सर्व नियमांचे पालन करून योग्य नियोजन व चहा नाश्त्याची सोय आयोजकांच्या वतीने करण्यात येईल. याची सर्वांनी नोंद घ्यावी. नाव नोंदणी साठी खाली काही नाव आणि नंबर देत आहोत कृपया आपण आपले नाव नोंदणी करावी.

नाव नोंदणीसाठी संपर्क

मयूर दत्तात्रय सोळसकर- 7350396767

 राहुल बापूराव आखाडे- 9860015655

 लक्ष्मण बजाबा खेनट- 9422344646

गणेश शंकर आखाडे- 9403542579

कालिदास ज्ञानोबा भिसे- 9511843522

संतोष पोपट आखाडे- 9860414147

प्रमोद माणिक गायकवाड- 9822709707

जितेंद्र भीमराव सोनवणे- 9623521524

पांडुरंग निवृत्ती वीर- 9975586001

अतुल शिवाजी आखाडे- 7887772727

दीपक अशोक जगताप- 9975262888

संतोष रामदास जगताप- 9970041790

 रामदास रघुनाथ आखाडे- 9923260707

 अतुल तात्यासाहेब भोंडवे- 8830961415, 

श्याम भाऊ कापरे – 9371235796