साधूंच्या हत्येनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा योगी आदित्यनाथांना फोन, साधूंच्या हत्येवरून म्हणाले…



मुंबई : सहकारनामा ऑनलाईन

महाराष्ट्रमध्ये झालेल्या दोन साधूंच्या हत्येनंतर आता उत्तर प्रदेशमध्येही दोन साधूंची हत्या झाल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याबाबत आपले ट्विट केल्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फोन करून याबाबत चिंता व्यक्त केल्याचे सामोरे आले आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी महिती देताना ‛मी आत्ताच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी यांच्याशी फोनवर चर्चा करून उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथे घडलेल्या दोन साधूंच्या अमानुष हत्येवरून चिंता व्यक्त केली. अशा अमानुष घटने विरुद्ध आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत. ज्या प्रकारे आम्ही अशा प्रकारच्या घटनेमध्ये कठोर कायदेशीर कारवाई केली आहे, त्याचप्रकारे तुम्ही सुद्धा कराल आणि दोषींना कडक शिक्षा कराल अशी अपेक्षा व्यक्त केली करत कोणीही या घटनांना धार्मिक रंग देऊ नये असे आवाहन करतो असे सांगितले आहे. महाराष्ट्रामध्ये दोन साधूंसह ड्रायव्हरची हत्या झाल्यानंतर योगींनी मुख्यमंत्र्यांना फोन करून याबाबत चिंता व्यक्त केली होती आता मुख्यमंत्र्यांनीही योगींना फोन करून दोन साधूंच्या हत्येप्रकरणी चिंता व्यक्त करत वरील आवाहन केले आहे.