केडगाव ग्रामपंचायतीकडून लॉकडाऊन काळात दुकाने आणि व्यवसायांबाबत नवीन नियमावली जाहीर, कोणते व्यवसाय चालू राहणार कोणते बंद याबाबत वाचा सविस्तर



दौंड : सहकारनामा ऑनलाईन(अब्बास शेख)

दौंड तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणाऱ्या केडगाव ग्रामपंचायतीने आज  बैठक घेऊन लॉकडाऊन संदर्भात नवीन नियमावली जाहीर केली असून या नवीन नियमांनुसार दि.१३/५/२०२० पासून किराणा दुकान,पशुखाद्य,ड्रीप पाईप लाईन,फॅब्रिकेशन,सिमेंट बांधकाम मटेरियल (शेतीकामाकरिता), मिरची कांडप, वाईनशॉप, पिठगिरणी, बेकरी, मटन, चिकन, मासे विक्री, स्टेशनरी, मोबाईल, इलेक्ट्रिकल्स, शुमार्ट, कापड दुकान,झेरॉक्स,चष्मा

दुरुस्ती, हार्डवेअर, टायर दुकान,ऑटोमोबाईल्स,सायकल,मोटार सायकल दुरुस्ती, ट्रक दुरुस्ती गॅरेज हे सर्व व्यवसाय बुधवार, शुक्रवार,रविवार, सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालू राहणार आहेत तर भाजीपाला विक्री जागेवर बसून न करता घरोघरी फिरुन करावा जागेवर बसून भाजीपाला विक्री करू नये याबाबत निर्णय घेण्यात आले आहेत.

तसेच दवाखाना,मेडिकल,हॉस्पिटल,खत दुकान व शेती औषधे,टायर पंक्चर दुकान,गॅस एजन्सी,पेट्रोल पंप आठवडा भर चालू राहतील.

मात्र स्वीट होम,केशकर्तनालय,पानपट्टी,हॉटेल हे पुढील आदेश होईपर्यंत बंद राहणार असून दुध संकलन केंद्र,दुध पिशवी,पाणी जार वाटप दररोज सकाळी ६ ते ९ व सायकांळी ७ ते ९ या वेळेतच सुरु राहतील असे जाहीर करण्यात आले आहे. रेशनिंग दुकानाबाबत सकाळी ८ ते सायकांळी ८ या वेळेत सुरु राहतील अशी माहिती देण्यात आली असून सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार या दिवशी पूर्णपणे लॉकडाऊन पाळण्यात येईल.

या व्यतिरिक्त इतर सर्व व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्यात यावेत जे खरेदीसाठी चार

चाकी गाडी व मोटार सायकल आणणार आहे त्यांनी त्यांची गाडी बाजार मैदानातच

पार्किग करावी तसे न केल्यास कारवाई करण्यात येईल याबाबत निर्णय करण्यात आले. वरील सर्व व्यवसायकांना दिलेल्या वेळेचे बंधन पाळणे अनिवार्य राहील या व्यतिरिक्त इतर वेळी व्यवसाय कायदा २००५ महाराष्ट्र अधिनियम १९५१ भारतीय

साथरोग अधिनियम १८५७ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही नमूद करण्यात आले. वरील नमूद केलेल्या सर्व अत्यावश्यक सेवेमध्ये प्रत्यक्ष काम करणान्या

सर्वानी स्वताची आरोग्य तपासणी करून घेणे बंधनकारक राहील तसेच कोणत्याही

आजाराची प्राथमिक लक्षण आढळून आलेस त्यांनी अत्यावश्यक सेवेमध्ये काम करू नये व वैद्यकीय सल्यानुसार पुढील आवश्यक ते उपचार घ्यावेत तसेच सदर कालावधीमध्ये पोलीस प्रशासनाकडून तपासणी केली जाणार असून त्यामध्ये विनाकारण फिरत असताना कोणी आढळ्यास त्या व्यक्तीवर कलम १४४ जमावबंदी व कलम १८८ संचार बंदी अन्वये पोलीसामार्फत कायदेशीर कारवाई करन गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.