पारगावमध्ये एक ‛महिला’ कोरोना पॉझिटिव्ह, कोरोनाची बाधा मात्र पारगाव मध्ये नव्हे तर या ठिकाणी झाली!



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यातील पारगाव येथे एका महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटव्ह आला आहे. त्यामुळे आता केडगाव, बोरीपार्धी नंतर या गावांच्या वेशीवर असणाऱ्या पारगावचाही कोरोना बाधित रुग्णांच्या गावांमध्ये समावेश झाला आहे.

पारगावमध्ये सापडलेली कोरोना बाधित महिला हि गुऱ्हाळावर काम करत होती अशी माहिती मिळत असून ही महिला डिलिव्हरीसाठी पुण्यातील सरकारी रुग्णालयात भरती झाल्यानंतर तिला कोरोनाची बाधा झाली असावी अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक रासगे यांनी ‛सहकारनामा’शी बोलताना दिली आहे.