न्यूज १८ च्या अँकरचा दौंड एम.आय.एम. कडून निषेध, पोलिसांना कारवाईचे निवेदन



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी )

सर्वच धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले महान सुफी संत हजरत ख्वाजा मोईनोद्दीन चिश्ती यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या न्युज १८ चे अँकर अमिष देवगण याचा दौड एम.आय.एम. पक्षाच्यावतीने निषेध करण्यात आला. यावेळी पक्षाच्यावतीने पो.नि सुनिल महाडीक यांना निषेध व संबंधितांवर कायदेशीर कारवाईच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. 

न्युज १८ वाहिनीवरीलवरील एका कार्यक्रमात अमिष देवगन याने ह.ख्वाजा मोईनोद्दीन चिश्ती यांच्याबद्दल अपशब्दाचा वापर केला होता. ज्यामुळे समस्त मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. मुस्लीम समाजासहीत सर्वच समाजातील लोक चिश्तींचे अनुयायी आहेत याची माहिती असून सुध्दा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने अमिष देवगन याने हे कृत्य केले असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या वाहिनीचे सि.ई.ओ.राहूल जोशी व अँकर अमिष देवगण यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी मागासवर्गीय समाजातील युवक अरविंद बनसोडे व पिंपरी शहरातील विराज जगताप खून प्रकरण जलदगती न्यायालयापुढे घेवून संबंधितांना कठोर शासन व्हावे अशी मागणीही यावेळी एम.आय.एम.पक्षाच्यावतीने

करण्यात आली. निवेदन देते वेळी पक्षाचे शहराध्यक्ष मतीन शेस, हमीद शेख, शिवेसेनेचे पदाधिकारी गणेश दळवी, मुजाहीद शेख, अमीर शेख, साजन शेख आदी उपस्थित होते.