गुटखा वाहतूक करणारा ‛तो पोलीस’ अखेर सेवेतून बडतर्फ



पुणे : सहकारनामा ऑनलाईन

शिरूर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या त्या पोलिसावर अवैधरित्या गुटखा वाहतूक केल्या प्रकरणी अखेर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी कारवाई केली असून त्याला तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. नारायणगाव शिरूर असा  गुटखा सप्लाय करणाऱ्या पोलिसासह एकावर गुन्हा दाखल करण्यात येऊन 30 हजारांच्या गुटख्यासह एक स्विफ्ट कार असा एकूण 3 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. राज्य शासनाने गुटखा खाण्यावर तसेच विकण्यावर बंदी घातली असतानाही गुटखा वाहतूक करणारा पोलिस कॉन्स्टेबल किशोर धवडे आणि हनिफ इब्राहिम तांबोळी या दोघांना गुटखा वाहतूक करताना पकडण्यात आले होते या नंतर या दोघांवरही नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुटखा सप्लाय करणारा पोलीस असून तो शिरूर पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याचे उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ माजली होती. 



आपल्या पदाचा गैरवापर करून गुटखा व्यवसायात सहभागी असल्याचे स्पष्ट  झाल्याने पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक पोलीस संदीप पाटील यांनी  पोलीस कॉन्स्टेबल किशोर ज्ञानदेव धवडे यास सेवेरून बडतर्फ करत असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकात दिली.