अन्यथा लष्कराची मदत घेण्याची वेळ येईल : अजित पवार



: सहकारनामा ऑनलाइन

– देशामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने केंद्र सरकारने लॉकडाउनची घोषणा केली आहे. याची अंमलबजावणी राज्यात सर्वत्र सुरू झाली आहे मात्र अजूनही अनेकजण गरज नसताना रस्त्यावर फिरताना दिसत आहेत त्यामुळे कोरोनाविरुद्ध पुकारलेल्या युद्धालाच तिलांजली मिळत असल्याने आता जनतेने शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन केले नाही तर थेट लष्कराची मदत घ्यावी लागू शकते असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.

कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील होणाऱ्या हल्ल्याबाबत बोलताना अश्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत हल्ले करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. नागरिक आणि पोलीस यांच्यामध्ये उडत असलेल्या चकमकीबाबत बोलताना पोलिस आणि नागरिक दोघांनीही सय्यम आणि शिस्त  पाळण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. जगामध्ये कोरोनाचा थैमान चालू असून नागरिकांना घरात अमेरिकेत लष्कराची मदत घेण्यात आली आहे. आपल्या राज्यात ती वेळ येऊ नये यासाठी सर्वांनी जबाबदारीने वागले पाहिजे  असेही त्यांनी म्हटले आहे.

राज्यात असणाऱ्या लॉकडाउन बाबत माहिती देताना राज्यामध्ये जरी 21 दिवसांचा लॉकडाऊन असला तरी दूध, भाजीपाला, फळे, औषधे, अन्नधान्य, घरगुती गॅस या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित सुरु ठेवण्यात आला परंतु तरीही नागरिक मोठ्याप्रमाणावर बाजारात गर्दी करत असल्याने हे चिंताजनक आहे असे त्यांनी सांगितले असून जनतेने कोरोना व्हायरसचे गांभीर्य ओळखून आपल्या वागणुकीचे भान ठेवावे आणि पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन शेवटी त्यांनी केले आहे.