Categories: Previos News

पुण्यासारखी ‛दौंड’मध्ये व्हाट्सअप मटका बहाद्दरांवर कारवाई होणार का?



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (सुमित सोनवणे)

दौंड मध्ये सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दौंडकर नागरिक या लॉकडाउन मध्ये हैराण झाले असून दौंड पोलिसांनी अवैध धंदे करणाऱ्या टोळक्याविरुद्ध कारवाई केली पण दौंड मध्ये व्हाट्सएपवर अवैध मटका जोरदार सुरू आहे त्यावर मात्र दौंड पोलिसांचा अंकुश राहिला नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता पुण्यात जशी ऑनलाइन व्हाट्सएपच्या माध्यमातून मटका घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली तशीच कारवाई दौंड मध्ये व्हाट्सएपवर मटका घेणाऱ्यांवर देखील करण्यात यावी अशी मागणी दौंड मधील नागरिक करीत आहेत. 

व्हाट्सएपच्या माध्यमातून मटका घेणारे दौंड मध्ये अनेक जण आहेत आता त्यांच्यावर पोलिसांनी चाप लावावा 

व्हाट्सएपच्या माध्यमातून घरात बसून मटका वेळेवर घेत असून पोलीसांच्या देखील लक्षात येत नसल्याने हे मटका घेणारे आणि मटका खेळणारा समोर येत नाही आणि त्यांच्यावर पोलिसांची नजर देखील पडत नाही. त्यामुळे ही मंडळी ‘शान के साथ’ शहरात वावरताना दिसतात.

व्हाट्सएपच्या मेसेजद्वारे मटका खेळायचा मटका लागला तर पैशाची देवाण घेवाण ऑनलाईन पेमेंट करून होती त्यामुळे यांना कुणाचे भय राहिले नाही त्यामुळे अशा ऑनलाइन व्हाट्सएपच्या माध्यमातून मटका चालवणाऱ्या मंडळींवर पोलिसांनी कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

1 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago