दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
‛कोरोना’व्हायरसने जगभरात हाहाकार माजवला आहे. श्रीमंत, मध्यम, गरीब कुणीच याच्या तावडीतून सुटत नाहीये त्यामुळे देशातही लॉकडाउन सारखा निर्णय घेण्यात आला. रोजंदारीवर काम करणाऱ्या अनेक कुटुंबांवर त्यामुळे आपल्या गुजराणीची बिकट वेळ येऊन ठेपली आहे. अश्यातच काही कुटुंबांचे तर खण्यापिण्याचेही हाल झाला आहेत. अशीच एक घटना दौंड तालुक्यातील चौफुला येथे घडली. गेल्या पाच सहा वर्षांपासून मोलमजुरी करून आपली उपजीविका भागावणारं एक कुटुंब येथे राहत आहे. लॉक डाऊन घोषित झाल्यानंतर या कुटूंबावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली होती. त्यांच्याकडे असणाऱ्या थोड्याफार पैशांमध्ये दोन दिवसांची भूक भागली मात्र आता पुढे काय ? असा प्रश्न त्यांना पडला होता. शेजारील लोकांनी आणखी दोन दिवस त्यांची सोय केली मात्र शेजारी पाजाऱ्यांवर किती अवलंबून राहणार असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला आणि कुणीतरी त्यांना दौंडचे आमदार राहुल कुल हे लॉक डाऊन काळात गरजू लोकांना मदत करत असल्याचे समजले. ही माहिती मिळाल्यानंतर या कुटूंबातील प्रमुखाने स्थानिक कार्यकर्त्यांना याबाबत विचारपूस केली आणि त्यांना दुसऱ्याच दिवशी ‛आमदार किट’ मिळाले. या किटमध्ये एका कुटुंबाला पंधरा दिवस पुरेल इतकी सामग्री देण्यात आली असल्याने त्यांचा पंधरा दिवसांचा खाण्याचा प्रश्न सुटला आहे. याबाबत या कुटुंबातील प्रामुख्याने हे मदतीच स्वरूप छोट जरी असलं तरी आम्हाला मिळालेल्या मदतीची किंमत लाख मोलाची आहे अशी भावना व्यक्त केली.