पूर्व हवेलीत कोरोनाचा पहिला बळी



थेऊर : सहकारनामा ऑनलाईन

कवडीपाट माळवाडी परिसरातील एक वयोवृद्ध महिला हडपसर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्युमुखी पडली तिच्या अहवालात कोरोना बाधित असल्याची माहिती समोर आली आहे यामुळे हवेली तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे.

कदमवाकवस्ती ग्रामपंचायत ह्द्दीतील माळवाडी येथील एका महिलेला मागील कांही दिवसापासुन मुत्राशयाचा त्रास सुरु असल्याने, बुधवारी (दि. २९) दुपारी हडपसर येथील एका खाजगी रुग्नालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. संबधित महिलेवर उपचार चालु असताना, गुरवारी मध्यरात्रीच्या संबधित महिलेचा मृत्यु झाला. मृत्युनंतर खाजगी रुग्नालय प्रशासनाने संबधित महिलेची कोरोना टेस्ट केली असता, ती पाॅजिटीव आली. 

दरम्यान माळवाडी येथील मृत्युमखी पडलेली महिला कोरोना बाधीत असल्याचे उघड होताच, कदमवाकवावस्ती ग्रामपंचायत प्रशासन व जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागाने कोरोना बाधीत महिलेच्या संपर्कात आलेल्या माळवाडी येथील तब्बल सत्ताविस जनांना तातडीने माळवाडी परीसरातील नागरीकांच्या पासुन वेगळे केले आहे. वेगळे केलेल्या सत्ताविस जनांची कोरोनाची तपासणी करण्यासाठी, त्यांना पुणे येथील नवले रुग्नालयात हलविले असल्याची माहिती लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. डी. के. जाधव यांनी दिली. 

याबाबत अधिक माहिती देताना लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी, डॉ. डि. जे. जाधव म्हणाले, आशा सेविकांनी तिन दिवसापुर्वी माळवाडी परीसरात घरोघरी जाऊन माहिती घेतली होती. त्यावेळी महिलेच्या नातेवाईकांनी महिला आजारी असल्याबाबत कसलीही माहिती दिली नव्हती. मात्र बुधवारी मुत्राशयाचा त्रास सुरु झाल्याने, संबधित महिलेला हडपसर येथील रुग्नालयात दाखल केले होते. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास महिलेचा मृत्यु झाल्यानंतर, महिलेची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. दरम्यान महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच, ग्रामपंचायतीने माळवाडी व परीसर निर्जुकीकरण करुन घेतले आहे. तसेच हा भाग पुर्णपणे सिल केला असुन, महिलेच्या संपर्कात आलेल्या सत्ताविस जनांची कोरोना टेस्ट करण्यासाठी नवले रुग्नालयात हलविले आहे. तर संबधित महिलेच्या संपर्कात आनखी कोणी आले का याची माहिती घेण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. दरम्यान पंधरा दिवसाच्या कालावधीत उरुळी कांचन येथील एका महिलेसह चार जण कोरोना बाधीत असल्याचे आढळुन आले आहे. या चार जनात सत्तेचाळीस वर्षीय महिला, संबधित महिलेवर उपचार करणारे कदमवाकवस्ती येथील खाजगी रुग्नालयातील एक डॉक्टर, दोन नर्सचा समावेश आहे. वरील डॉक्टर व महिलेच्या संपर्कात आलेल्या सव्वाशेहुन अघिक जण कोरोटांईन असतानाच, माळवाडी येथील येथील महिलेचा मृत्यु झाल्याची बाब पुढे आल्याने पुर्व हवेलीत भितीचे वातावरण पसरले आहे