पुणे-वाघोली :सहकारनामा ऑनलाइन (पूजा भोंडवे)
– भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने ११ वी. च्या पाठय पुस्तकातील रेडिओ जॉकी या पाठाचे मार्गदर्शन करण्यासाठी आर. जे. बंड्या यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आर.जे. ही आज काळाची गरज निर्माण झाली आहे. कारण आज आनेक रेडिओ चैनल नव्याने येत आहेत त्यामुळे प्रसारमाध्यमांमध्ये नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. मुलांनी आपल्या कुवतीप्रमाणे, आपल्या कौशल्याप्रमाणे आपल्या करिअरची निवड करायला हवी. असे मत आर.जे. बंड्या यांनी व्यक्त केले. रेडिओ जॉकी वरील कार्यक्रमांची रूपरेषा कशी असते. आकाशवाणी कशी चालते याविषयी सखोल असे मार्गदर्शन आर. जे. बंड्या यांनी केले. ११वी च्या मुलांसाठी व वसतिगृहाच्या मुलांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री. संतोष भंडारी, उपप्राचार्य श्री.दिलीप देशमुख , सर्व प्राध्यापक वृंद व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य संतोष भंडारी यांनी केले तर पाहुण्यांची ओळख उपप्राचार्य दिलीप देशमुख यांनी करून दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.भारती गुरव यांनी केले तर आभार चंद्रकांत हिंडोळे यांनी मानले.