पुण्यात तळीरामांच्या दारू दुकानांसमोर लांबच लांब रांगा, मात्र हा निर्णय समजताच धरला घरचा रस्ता



पुणे : सहकारनामा ऑनलाईन

देशामध्ये कोरोनामुळे लॉकडाउन करण्यात आले आणि अत्यावश्यक सेवा सोडून सर्व दुकाने बंद करण्यात आली. यामुळे तळीरामांना मोठा झटका बसला होता. पण आता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दारु विक्रीला सशर्त परवानगी मिळाली असल्याने आहे. आजपासून तिन्ही झोनमध्ये दारुची दुकाने उघडली जातील असे सांगण्यात आले आहेत. ही बातमी समजताच पुण्यात सकाळपासूनच तळीरामांनी वाईन शॉप बाहेर मोठ्या प्राणावर गर्दी केली. अनेकजण तासंतास रांगेत उभे राहुन उभे असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. मात्र पुणे शहरासह जिल्ह्यात दारुची दुकान अद्याप उघडली जाणार नाहीत असे पोलिसांनी सांगताच नाराज होऊन या तळीरामांनी घरचा रस्ता धरल्याचे पाहायला मिळाले.

पोलिसांनी येऊन हटकू नये यासाठी हे तळीराम तोंडाला मास्क लावून, हातामध्ये बॅगा घेऊन सोशल डिस्टन्स पाळत भर उन्हात उभे होते. सुमारे दीड महिन्यानंतर दारु मिळणार असल्याने तळीरामांना अत्यानंद झाला असल्याचे दिसत होते मात्र प्रशासनाकडून कोणताही आदेश न आल्यानं वाईन शॉप सुरु झाले नाही. त्यामुळे सकाळ पासून रांगेत उभे राहिलेल्या तळीरामांनी मोठी निराशा झाली. याबाबत नवीन निर्देश आल्यानंतर दारू दुकाने चालू करायची की बंद ठेवायची यावर निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते