Categories: Previos News

देऊळगाव राजे’च्या शेतकरी कुटुंबातील शिवचरणची ‘गरुड कमांडो’ पदी निवड

देऊळगाव राजे : सहकारनामा ऑनलाईन

देऊळगाव राजे येथील शिवचरण अर्जुन सूर्यवंशी या शेतकरी कुटुंबातील मुलाची अफाट जिद्दीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात ‛गरुड कमांडो’ पदी निवड झाली आहे. संपूर्ण देशात शिवचरण  ३१ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.

शिवचरणचे दुसरी ते दहावीपर्यंत शिक्षण नेवासा येथील घाडगे पाटील सैनिकी विद्यालयात झाले आहे. तो दहावीला तब्बल ९८% गुण मिळवून अहमदनगर जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता त्यानंतर त्याने ११वी, १२वी चे शिक्षण कोल्हापूर येथील साइरास पुनावला पेठ वडगाव या ठिकाणी CBSC पॅटर्न ने घेतले. त्यात त्याला ७४% गुण मिळाले होते. पहिल्याच प्रयत्नात त्याची गरूड कमांडो पदी निवड झाल्याने दौंड तालुक्यातून त्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दर वर्षी संपूर्ण देशातून या पदासाठी १७४जणांची निवड केली जाते. त्याच्या आई, वडिलांनी त्यास शेती काम करून काबाड कष्ट करून शिक्षण दिले. या गरीबीची जाण ठेऊन कुठल्याही खाजगी शिकवनिशिवाय घरीच अभ्यास करून त्याने हे उज्वल यश संपादित केल्यामुळे शिवचरणचे कौतुक होत आहे. १जुलै पासून तो ट्रेंनिग साठी बेंगलोर येथे रुजू होणार आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

1 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago