Categories: Previos News

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू, आमदार राहुल कुल यांच्या सुचनेमुळे त्वरित कार्यवाही



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या महसूल, कृषी व वीज वितरण विभागाला आमदार अॅड. राहुल कुल यांचेकडून सूचना करण्यात आलेल्या होत्या त्याबाबाबत आता कार्यवाही सुरू झाली असून नुकसान ग्रस्त शेतकरी व नागरिकांनी याबाबत संबंधीत अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपले पंचनामे करून घ्यावेत अशी विनंती आमदार राहुल कुल यांनी नागरिकांना केली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी कि, मागील आठवड्यात दौंड तालुक्यातील कासुर्डी, जावजीबुवाचीवाडी, डाळिंब, भरतगाव,  बोरीभडक, बोरीऐंदी, नांदूर, सहजपूर, खामगाव व परिसरात गारांसह अतिवृष्टी झाली त्यामध्ये शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे प्रामुख्याने ऊस, भाजीपाला आदींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक ठिकाणी घर व गोठ्यांवरील पत्रे उडाले, साठवण चाळीतील कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तर अनेक ठिकाणी विद्युत वाहक पोल पडल्याने विद्युत प्रवाह खंडीत झाला आहे.

या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी महसूल, कृषी व वीज वितरण विभागाला आवश्यक त्या सूचना आमदार अॅड. राहुल कुल  यांनी केलेल्या आहेत. शासकीय यंत्रणेद्वारे पंचनामे करण्यास सुरुवात झाली असुन नुकसान भरपाईच्या पुढील कार्यवाहीसाठी शेतकरी व नागरिकांनी आपल्या गावातील तलाठी व कृषी अधिकारी यांचेशी संपर्क करून आपले झालेल्या नुकसानीचे पंचमाने करून घ्यावेत अशी विनंती आमदार अॅड. राहुल कुल यांनी सर्व नुकसानग्रस्त शेतकरी बंधू आणि नागरिकांना केली आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

23 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago