धक्कादायक : बारामती मधील ‛कोरोना’बाधिचा मृत्यू



बारामती : सहकारनामा ऑनलाईन

बारामती शहरामध्ये कोरोना बाधित सापडलेल्या रुग्णाचा पुण्यामध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. याबाबतची अधिकृत माहिती बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी ‛सहकारनामा’शी बोलताना दिली. सदर रुग्ण हा भाजी विक्रेता होता. त्याचे वय हे साठ वर्षांच्या पुढे होते तसेच त्याला अर्धांगवायूचा त्रासही होता. त्याची रोग प्रतिकारक शक्ती ही कमी झाल्याने त्याचा कोरोना विरुद्धचा लढा हा अपयशी ठरला. आज पहाटे साधारण दिड वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू  झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. नागरिकांनी दक्षता घेऊन शक्यतो अत्यावश्यक गरज नसेल तर घराबाहेर पडूच नये असे आवाहन प्रांताधिकाऱ्यांनी केले आहे.