श्री क्षेत्र जेजुरी कडेपठार गडावर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने वृक्षारोपण



लोणीकाळभोर : सहकारनामा ऑनलाइन (महेश फलटणकर)

महाराष्ट्राचे अराध्य दैवत श्रीक्षेत्र जेजुरी येथील कडेपठार गडावर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पुणे जिल्ह्याच्या वतीने रविवारी हजारो झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे. ही झाडे मोठी झाल्यानंतर येथे वनराई बहरनार आहे त्यामुळे पत्रकार संघाच्या या उपक्रमाचे पंचक्रोशीतुन कौतुक केले जात आहे.

महाराष्ट्रातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान कडेपठार येथील जागृत देवस्थान श्री खंडोबाचे मुळ ठीकाण आहे येथे दर्शनासाठी भक्तांना पायी ऊंच डोंगर चढुन जावे लागते संपुर्ण परीसर डोंगराचा असल्याने भक्तांसाठी सावलीचा निवारा व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पुणे जिल्ह्याच्या वतीने राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा अध्यक्ष सिताराम लांडगे यांनी कडेपठार गडावर वनराई ऊभारण्याची संकल्पना प्रत्यक्षात राबऊन हजारो झाडे देवस्थान समितीला दिली यामध्ये आंबा, अशोक, सुरू, जांभुळ, सिताफळ,रिप, गुलाब, जास्वंद, कलमी मोगरा, बकुळी, शेवंती, सोनचाफा, मोगरा, पांढरा चाफा, गोकर्ण, बसरी गुलाब, पिवळा गुलाब, आदी झाडे शेकडो झाडे श्री मार्तंड देवस्थान ट्रस्टला देण्यात आली असून आज देवस्थानच्या वनराईत या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पुणे जिल्हा अध्यक्ष सिताराम लांडगे, हवेली तालुका अध्यक्ष महेश फलटणकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य शरद पुजारी, तालुका कार्यकारिणी सदस्य गणेश धुमाळ, कंज्युमर प्रोटेक्शन समितीचे जिल्हा अध्यक्ष विकास तिखे, देवस्थान चंपाषष्टी समितीचे सदस्य मनोज मोहीते, देवस्थान ट्रस्टचे सचिव सदानंद बारभाई ऊपस्थीत होते