Categories: Previos News

कोरोना रुग्णाची माहिती जाहीर करणे आले अंगलट, उरुळी कांचन येथील दोघांवर गुन्हा दाखल

पुणे : सहकारनामा ऑनलाईन

हवेली तालुक्यातील उरूळी कांचन येथे एका महिलेला झालेल्या कोरोना संसर्गामुळे पुण्यात भरती करण्यात आल्या नंतर तिची माहिती सोशल मिडीयाच्या स्टेटसवर ठेवणे दोघाजनांच्या चांगलेच अंगलट आले असून या दोन तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार उरुळी कांचन येथील एका महिलेला करोनाची बाधा झाल्याचे समोर आले यानंतर  या दोन तरूणांनी त्या कोरोना बाधित महिलेचे नाव, ठिकाण व्हायरल केले असल्याची माहिती उरुळी कांचन दूरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक पवन चौधरी यांना मिळाली यानंतर हवालदार सोमनाथ चितारे यांनी याबाबत फिर्यादी दिली त्यावरून प्रदीप आटोळे व नितीन टिळेकर (दोघे रा. उरूळी कांचन, ता. हवेली) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यातील एकाने स्टेटस ठेवले व एकाने एडिट केल्याचे समजत आहे. याबाबत पुढील तपास लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पवन चौधरी व सोमनाथ चितारे करत आहेत.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

23 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago