पुणे : सहकारनामा ऑनलाईन
हवेली तालुक्यातील उरूळी कांचन येथे एका महिलेला झालेल्या कोरोना संसर्गामुळे पुण्यात भरती करण्यात आल्या नंतर तिची माहिती सोशल मिडीयाच्या स्टेटसवर ठेवणे दोघाजनांच्या चांगलेच अंगलट आले असून या दोन तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार उरुळी कांचन येथील एका महिलेला करोनाची बाधा झाल्याचे समोर आले यानंतर या दोन तरूणांनी त्या कोरोना बाधित महिलेचे नाव, ठिकाण व्हायरल केले असल्याची माहिती उरुळी कांचन दूरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक पवन चौधरी यांना मिळाली यानंतर हवालदार सोमनाथ चितारे यांनी याबाबत फिर्यादी दिली त्यावरून प्रदीप आटोळे व नितीन टिळेकर (दोघे रा. उरूळी कांचन, ता. हवेली) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यातील एकाने स्टेटस ठेवले व एकाने एडिट केल्याचे समजत आहे. याबाबत पुढील तपास लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पवन चौधरी व सोमनाथ चितारे करत आहेत.