Categories: Previos News

“सहकारनामा विशेष” ऑनलाईन वाहन खरेदी करणाऱ्यांनो सावधान, स्वस्तात गाडी मिळतेय ! तर मग हे वाचाच…



पुणे : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

राज्यात सध्या ऑनलाइन फसवणुकीचे अनेक प्रकार घडत आहेत. यात सध्या मोठ्या रकमेंची फसवणूक ही चारचाकी वाहनांमध्ये होत असल्याचे समोर येत आहे. विविध वाहन विक्री होणाऱ्या साईट्सवर, सोशल मीडियावर 2-3 वर्षांपासून ते 10-12 वर्षा पर्यंतच्या वाहनांची विक्रीची जाहिरात आणि तीही कमी किंमतीत हमखास पहायला मिळते. मात्र, नागरिकांनी या जाहिरातींना, कमी किंमतीला न भाळता सावधानता बाळगण्याची नितांत गरज आहे.  महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये वेबसाइटवरून जुनी वाहने खरेदी करणाऱ्या अनेक लोकांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे.

जुनी वाहने आणि त्यांची खोटी माहिती टाकून ऑनलाईन पैसे घेऊन  फसवणूक केली जात असल्याच्या अनेक तक्रारी सायबर पोलिसांकडे येत आहेत.

अशी होते फसवणूक…


ऑनलाईन फसवणूक करणारे हे माफिया अगोदर सोशल मीडिया, वेबसाईट आणि वाहन खरेदी-विक्री करणाऱ्या अनेक फ्री ऍपवर वाहनांचे फोटो टाकतात. त्यानंतर त्या वाहनाची किंमत ही बाजार भावापेक्षा 50 ते 60 टक्क्यांनी कमी टाकली जाते. उदा- 2014 अल्टो k10 ची मार्केट रिसेल प्राईस 1 लाख 25 हजार ते 1 लाख 50 हजार असेल तर त्या वाहनाची किंमत हे फसवणूक करणारे साधारण 70 हजार ते 75 हजार अशी ठेवतात. त्यामुळे ग्राहक आपोआप त्याकडे आकर्षित होऊन त्यांना संपर्क करतात.

त्यावेळी हे महाभाग त्या ग्राहकांचा विश्वास संपादन करून आपले खोटे आयडेंटि कार्ड, ओळखपत्र त्यांना पाठवून देतात. तसेच आम्हाला पैशांची अचानक अडचण उभी राहिली आहे, आजच गाडी विकायची आहे, आमचे वाहन दुसऱ्या राज्यात आहे ते इकडे आपल्या राज्यात आणण्यासाठी काही पैसे लागतील असे सांगून त्यांच्या खात्यावर पैसे मागवून घेतात. 

स्वस्त दरात वाहन मिळतेय म्हणून ग्राहकही त्यांच्या जाळ्यात सहजपणे ओढला जातो आणि मोठ्या रकमेला तो बळी पडतो. हे लोक दोन-तीन वेळेस संपर्क साधून पैसे मागून घेतात. मात्र वाहन काही ग्राहकास मिळत नाही. कारण ते अस्तित्वातच नसते. जे वाहनाचे फोटो ते टाकत असतात ते फोटो खोटे असतात. कारण ते फोटो त्यांनी नेटवरून चोरी करून वापरलेले असतात. विशेष म्हणजे ज्या वाहन मालकाच्या नावावर हे वाहन आहे तेच नाव सांगून हे लोक फसवत असतात. 

2-3 वेळा पैसे पाठवूनही ज्यावेळी वाहन मिळत नाही त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे ग्राहकाच्या लक्षात येते आणि ते पोलिसांकडे तक्रार करतात. मात्र तोपर्यंत हजारो रुपयांची फसवणूक झालेली असते. 

शक्यतो हे लोक महाराष्ट्रातील ग्राहकांना फसविण्यासाठी राजस्थान, पंजाब, उत्तराखंड या राज्यातून हे रॅकेट चालवत असल्याचेही पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे.

अशी टाळता येऊ शकते फसवणूक…


वाहन खरेदी करताना शक्यतो आपल्या ओळखीच्या आणि जवळ असणाऱ्या डीलर, एजंटला संपर्क करावा.

त्यांच्याकडून वाहन पाहून घ्यावे, त्यामध्ये गाडीची कागदपत्रे, गाडीची बॉडी, गाडीचे इंजिन, इंजिन नंबर, चेसी नंबर हे आवर्जून पाहून घ्यावे.

> वाहन खरेदी करताना वाहन समोर असेल तरच त्याचा व्यवहार करावा, नुसते फोटो पाहून कधीच व्यवहार करू नये आणि इसार रक्कमही देऊ नये.

> गाडी घ्यायची ठरल्यास तिची मार्केट प्राईस किती याची माहिती विविध डीलर आणि एजंटकडून अवश्य करून घ्यावी.

> शक्य असल्यास त्या गाडीवर केस किंवा दंड आहे का हे आरटीओ मधून माहिती काढून घ्यावी.

> गाडी विकत घेताना लिखापडी करून गाडी घ्यावी, रोख पैसे देण्याऐवजी चेक किंवा ऑनलाईन पेमेंट वाहन मालकाच्या खात्यावर ट्रान्स्फर करावे.

> वाहन खरेदीमध्ये ऑनलाईन फसवणूक झाल्यास त्वरीत सायबर पोलिस स्टेशनकडे तक्रार करावी, त्यामुळे बँक खात्यात वर्ग केलेले पैसे पुन्हा तुम्हाला मिळू शकतात. मात्र अनेकवेळा ग्राहक फसवणूक झाल्यानंतर त्वरीत पोलिसांशी संपर्क साधत नाहीत आणि तोपर्यंत फसवणूक करणारी व्यक्ती खात्यावर तुम्ही वर्ग केलेले पैसे काढून घेते. त्यामुळे पोलिसांना तक्रारदाराला पैसे परत मिळवून देता येत नाहीत. वरील महत्वाच्या काही गोष्टी पाळल्यास नक्कीच तुमची फसवणूक होणार नाही.

जुन्या चारचाकी वाहनांच्या खरेदी-विक्री व  किंमतीच्या अधिक माहितीसाठी आमच्या विश्वासू  वाहन डीलरकडे आपण संपर्क साधून याबाबत अधिक माहिती मिळवू शकता

अमरीन मोटर्स – मो.8055000313 दौंड जि.पुणे

Sahkarnama

Recent Posts

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

6 तास ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

2 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago