Categories: Previos News

शहरात बाहेरून येणाऱ्या व्यक्तींची माहिती कळविण्याचे दौंड नगरपालिकेचे आवाहन.. शहर कोरोना मुक्त करणे सर्वांचीच जबाबदारी : मंगेश शिंदे



दौंड शहर : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)

दौंड शहरात बाहेरील जिल्ह्यातून तसेच पर राज्यातून येणाऱ्या व्यक्तींची माहिती तत्काळ दौंड नगरपालिकेला कळवावी असे आवाहन नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांनी दौंडकरांना केले आहे. 

दौंड नगरपालिका ही कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवित आहे. त्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे शहरात बाहेरून येणारे, विशेषतः रेड झोन मधून येणाऱ्या नागरिकांना शासनाच्या नियमाप्रमाणे गृह विलगीकरण करण्यात येत आहे. होम क्वारंटाईन केलेल्या प्रत्येक नागरिकाला सुरक्षा नियमावलीचे वाटप करण्यात येत आहे. तसेच त्या व्यक्तींची प्राथमिक वैद्यकीय चाचणी घेण्यात येऊन त्यांचे तापमान व ऑक्सिजन लेव्हल नोंदविण्यात येतात. त्यांच्या घरांवर होम क्वारंटाईन असे स्टिकर्स लावले जातात. तसेच संबंधितांच्या हातांवर होम क्वारंटाईन असा शिक्का मारण्यात येतो. दौंड नगरपालिकेतील अधिकारी हे या नागरिकांना 14 दिवस फोनवर वेळोवेळी संपर्क ठेवतात. यापैकी ज्या नागरिकांना ताप, सर्दी, खोकला सारखी कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आल्यास त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठविले जाते. दौंड शहर कोरोना मुक्त करण्याची जवाबदारी सर्वांचीच आहे त्यामुळे दौंडकरांनी सजग राहून आपली व आपल्या कुटुंबांची काळजी स्वतः घेतली पाहिजे, नागरिकांनी सामाजिक अंतर बाळगणे, वारंवार साबणाने हात धुणे, मास्क वापरणे व शासनाच्या सूचनांचे पालन करणे बंधन कारक आहे. आपण सर्वांनी मिळून करोना विषाणू दौंड शहरातून हद्दपार करण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती ती सुद्धा मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांनी दौंड वासियांना केली आहे. दौंड शहरातील कोणत्याही नागरिकांनी बाहेरून आलेल्या या व्यक्तींची माहिती लपविण्यासाठी मदत केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा नगरपालिकेने दिला आहे.

..तर होऊ शकते बाजारपेठ बंद

शहर व तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या पुन्हा हा वाढू लागल्याने सर्वत्र चिंतेचे  वातावरण आहे. शहरातील परिस्थिती आटोक्यात आल्याने बाजारपेठ होली करण्यात आली होती परंतु जर असे बाधित रुग्ण पुन्हा आढळणे सुरु झाल्यास पुन्हा हा बाजार पेठ बंद करावी लागते की काय अशी भीती आता व्यक्त केली जाऊ लागली आहे, आणि आणि म्हणूनच प्रत्येकाने कोरोनाशी लढताना योग्य ती खबरदारी घेतली तरच परिस्थिती आटोक्यात राहील असे प्रशासन वेळोवेळी सांगत आहे. बाजारपेठ खुली केल्यामुळे काही लोकांच्या हातांना काम काम मिळून दोन पैसे मिळून लागले आहेत परंतु बाजारपेठ बंद बंद झाल्यास अशांचे जीवन पुन्हा हा अडचणीत येऊन त्यांना ना संसाराचा गाडा ढकलणे अवघड जाणार आहे. याचाही दौंड करांनी विचार करावा व व जबाबदारीने वागावे असे प्रशासनाने आवाहन केले आहे.

Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

4 तास ago

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

20 तास ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

2 दिवस ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

3 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

4 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

4 दिवस ago