दौंड : सहकारनामा ऑनलाईन
दौंड तालुक्यातील केडगाव, चौफुला परिसरामध्ये शनिवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. पहाटे आलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी या परिसरामध्ये पावसाच्या किरकोळ स्वरूपाच्या सरी बरसल्या होत्या मात्र आज पहाटे आलेल्या पावसाने संपूर्ण परिसर न्हाऊन निघाला आहे. मान्सून दाखल व्हायच्या आतच हा पाऊस आल्याने जून महिन्यात येणाऱ्या पावसाबाबत शेतकरी वर्गामध्ये भाकीत वर्तविले जाऊ लागले आहे