अभिनेता इरफान खानचं मुंबईत निधन

मुंबई : सहकारनामा ऑनलाईन

शांत, सय्यमी आणि परिपूर्ण अश्या आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा सोडणारा अभिनेता इरफान खानचे बुधवारी मुंबईत निधन झाले आहे. जुन्या आजाराचा अचानक त्रास जाणवू लागल्याने त्याला मंगळवारी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात भरती करण्यात आले होते. बुधवारी सकाळी त्याची तब्येत आणखीन बिघडली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. इरफान खानचं वय ५५ असल्याचे सांगितले जात असून त्याने आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्याने कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर लंडनमधील रुग्णालयात उपचार घेत मात केली होती त्यानंतर तो पुन्हा भारतात परतला होता. बिल्लू , ‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘पानसिंग तोमर’, ‘द लंचबॉक्स’, ‘हैदर’, ‘गुंडे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारत आपली वेगळी छबी निर्माण केली होती. त्याच्या निधनाने अनेक सेलिब्रिटींनी दुःख व्यक्त करत त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

19 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago