दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
दौंड तालुक्यातील केडगाव येथे कोरोना बाधित डॉक्टरांच्या तीन नातेवाईकांचेही रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले असून त्यामुळे आता केडगाव आणि बोरीपारधी असे केडगाव परिसरात सापडलेल्या रुग्णांची संख्या एकूण पाच झाली आहे.
याबाबत दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रासगे यांनी माहिती दिली असून याबाबत नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
केडगाव परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडू लागल्याने आता केडगावकारांच्या चिंता वाढल्या असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी न घेतल्यास कोरोनाचा आणखीन धोका वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे