बारामती : सहकारनामा ऑनलाईन
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे. शेतमाल विक्रीसाठी बाजार पेठ उपलब्ध नाही, मात्र आता सुरू होतील अशी अपेक्षा आहे. त्यातही प्रथम नोंदणी करा, नंतर आपला नंबर लागेल त्यानंतर माल विकला जाईल व नंतर पेमेंट अदा केले जाईल अशा या सर्व प्रक्रियेत शेतकरी भरडला जाणार हे दिसत असल्याने शेतकरी कर्जवाटपाच्या प्रतीक्षेत आहे त्यामुळे तत्काळ चालू कर्जदार व कर्जमाफीत बसलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दौंड विधानसभा मतदार संघाचे पक्षनिरीक्षक बापूराव सोलणकर यांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे.
यावेळी बापूराव सोलणकर यांनी बोलताना सध्या शेतीच्या मशागतीकरिता खूप मोठा खर्च लागतो अशातच हवामान खात्याने जूनच्या दुसऱ्या आठवड्यातच पेरणी होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस खते, बी बियाणेची सोय लावावी लागणार आहे. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे व आता कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्व ठिकाणी लॉकडाऊन असल्यामुळे द्राक्षे, कलिंगड ही पिके मार्केट पर्यंत विकण्यासाठी गेली नाही त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे. त्यातच मागील सरकारच्या काळात अनेक अटी घालून झालेल्या कर्जमाफी मूळे अनेक शेतकरी कर्जमाफीत वंचित राहिले. थकीत परंतु अताच्या कर्जमाफी मध्ये अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. अनेक शेतकऱ्यांची कर्जमाफ झाली अशा शेतकऱ्यांना तसेच चालू कर्जदार शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे जेणेकरून ह्या अचानक कोरोना च्या उद्भवलेल्या संकटामुळे तसेच आधीच आर्थिक मेटकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दौंड विधानसभा मतदार संघ पक्षनिरीक्षक बापूराव सोलणकर यांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली आहे.