केडगाव-बोरीपार्धी’मध्ये पुन्हा एक कोरोना पॉझिटिव्ह : एकूण संख्या झाली नऊ, जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यातील केडगाव-बोरीपार्धी येथे आज सायंकाळी पुन्हा एका व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे त्यामुळे आता केडगाव आणि त्याला लागूनच असलेल्या बोरीपार्धी गावाची एकूण कोरोना रुग्ण संख्या 9 झाली आहे. 

कोरोना पॉझिटिव्ह असलेली व्यक्ती ही पुणे येथे कामाला होती अशी माहिती मिळत आहे. सायंकाळी ही व्यक्ती कोरोना बाधित असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक रासगे यांनी सहकारनामा’शी बोलताना दिली.

केडगावमध्ये प्रथम एका डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली होती त्यानंतर पुन्हा त्याच्या कुटुंबातील इतर व्यक्तींचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्याच सायंकाळी बोरीपार्धी येथील एका गृहस्थाला कोरोनाची लागण झाली होती तर त्याच्या दुसऱ्या दिवशी केडगावमध्ये पुन्हा एक डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. आज सकाळी केडगाव एक, बोरीपार्धी एक आणि आज सायंकाळी पुन्हा बोरीपार्धी मधील एकजण असे एकूण नऊजण कोरोना पॉझिटिव्ह झालेले आहेत. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन दौंडचे तहसीलदार आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहे.