शरद पवारांचा मोठा निर्णय, आमदार, खासदारांचे एक महिन्याचे वेतन सहाय्यता निधीसाठी



पुणे : सहकारनामा ऑनलाइन(अब्बास शेख)

– जागतिक महामारी बनू पाहत असलेल्या करोना कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहेत. या महामारीला हरविण्यासाठी आणि त्यापासून होणारे नुकसान रोखण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही कंबर कसली असून सामाजिक जबाबदारीतून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठा निर्णय घेत राष्ट्रवादीच्या आमदार, खासदारांचे एक महिन्यांचे वेतन सहाय्यता निधीसाठी देण्यात येईल अशी घोषणा केली आहे. 



कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदीसारखी अमलात आणावी लागली आहे त्यामुळे लोकांचा रोजगार बुडाला असून शेती, उद्योगधंद्यांवर मोठा परिणाम झाला आहे. मात्र या संकटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनतेसोबत ठाम उभा असून राज्य व केंद्राच्या  सहाय्यता कार्यास हातभार लागावा या हेतूने राज्य विधिमंडळ सदस्यांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी आणि संसदेतील सदस्यांचे एक महिन्याचे वेतन प्रधानमंत्री सहाय्यता निधी ला देण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे.