दौंड : सहकारनामा ऑनलाईन
संचारबंदी असतानाही दुचाकींवर मोकाट फिरणाऱ्या लोकांवर पोलिसांवर दररोज कारवाई करण्यात येत आहे मात्र तरीही काही महाभाग हे पोलिसांची नजर चुकवून मोकळ्या रस्त्यावर फिरून हिरोगीरी करत आहेत. मात्र अशी हिरोगीरी करणे आता या मोकाट स्वारांच्या चांगलेच अंगलट येत असून यवत पोलिसांनी मोकाट फिरणाऱ्या दुचाकी स्वारांना चारचाकी वाहनातून पाठलाग करून पकडल्याची घटना पुणे सोलापूर हायवेवर घडली आहे. याबाबत संचारबंदीचा नियम मोडणाऱ्या दुचाकी स्वारांना पोलिसांनी थांबण्याचे आवाहन केले मात्र दुचाकी न थांबवता ती भरधाव वेगात पळवून या युवकांनी पोलिसांना चकविण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी चारचाकी वाहनातून पाठलाग करून पकडले. या प्रकरणी या दुचाकीस्वारांवर यवत पोलिसांकडून कारवाई करण्यात येऊन सर्व वाहने जप्त करण्यात येऊन केडगाव पोलीस चौकीत लावण्यात आली आहेत.