कुरकुंभ : सहकारनामा ऑनलाईन (आलीम सय्यद)
दौंड तालुक्यातील महाराष्ट्र विद्युत वितरण शाखा कुरकुंभ यांच्या वतीने विद्युत शाखा कार्यालय येथे वृक्ष रोपण करण्यात आले. वाढत्या प्रदूषणाच्या दरतीवर दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही एक कर्मचारी एक झाड असा उपक्रम करण्यात आला. यावेळी अनेक देशी-विदेशी वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या झाडांचे वृक्ष रोपण करण्यात आले.
यावेळी उपकार्यकरी अभियंता वैभव पाटील, सहाय्यक अभियंता प्रीतम साळवेकर, प्रधान यंत्राचालक अत्तार जे.आय, व कर्मचारी काशीराम मावस्कर, प्रशांत केकाण, महादेव बनकर, कांतीलाल मेरगळ,अभिजित शितोळे, राजेश थोरात, बाप्पू नरुटे, सचिन सरडे, आदि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.