दिल्ली : वृत्तसेवा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड
ट्रम्प हे भारतात दाखल झाले असून त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून स्वागत करण्यात आले आहे. ट्रम्प हे भारतात दाखल होताच भारतीय परंपरेनुसार त्यांचे भव्य, दिव्य असे जंगी स्वागत करण्यात आले आहे. ट्रम्प ज्या विमानानं भारतात दाखल आले आहेत. दुपारी १२ च्या सुमारास ते अहमदाबादमध्ये दाखल झाले आहेत. इथं त्यांच्या स्वागताचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला असून उल्लेखनीय म्हणजे, त्यांच्या भारतात येण्यापूर्वीच त्यांची खास लिमोजीन कार ‘द बीस्ट’ आणि हेलिकॉप्टर ‘मरीन वन’ भारतात दाखल झालं होत.