: सहकारनामा ऑनलाईन
एनडीटीव्हीचे ज्येष्ठ पत्रकार आणि मॅगसेसे पुरस्कार विजेते रवीश कुमार यांनी महाराष्ट्र सरकारने राहुल कुलकर्णी यांच्यावर केलेली कारवाई ठीक नसल्याचं म्हटलंय. राज्य सरकारला कारवाई करायची होती तर बांद्रा प्रकरणाला धार्मिक रंग देणाऱ्या माध्यमांवर करायला हवी होती असं रवीश यांनी आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट करत म्हटलंय.
याबाबत रविश कुमार यांनी पोस्टमध्ये आपल्या भावना व्यक्त करताना बांद्रा प्रकरणामध्ये अनेक मोठे संपादक यासंदर्भात ट्विट करत होते, मात्र त्यांच्यावर काही कारवाई झाली नाही. बातमी देताना मानवीय चूक होऊ शकते, मात्र त्याची शिक्षा जेल नाही. राहुल कुलकर्णी यांनी मोहरा बनवू नये असं रवीश यांनी म्हटलंय. ज्या अँकरनी मजुरांच्या वस्तुस्थितीला दुर्लक्ष करत मस्जिदचा अँगल देऊन या घटनेला धार्मिक रंग दिला तो अपराध आहे असं रवीश यांनी म्हटलंय.