दौंड : सहकारनामा ऑनलाईन
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंघाने राज्य शासनाने सौम्य, अतिसौम्य व लक्षणे नसलेल्या रुग्णांना डिस्चार्ज देतेवेळी कोव्हीड -१९ (कोरोना) चाचणी आवश्यक नसल्याचा मार्गदर्शक सूचना प्रशासनाला दिल्या आहेत परंतु दौंड मध्ये असलेल्या राज्य राखीव पोलीस दलातील जवानांच्या बाबतीत हा नियम लागू न करता कर्तव्य बजावून मुख्यालयात परत येणाऱ्या सर्व जवानांची नियमित व आवश्यक तितक्या वेळा कोव्हीड -१९ (कोरोना) चाचणी करण्यात यावी अशी मागणी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम साहेब यांचेकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन पोलीस बांधवांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक तितक्या वेळा कोव्हीड -१९ (कोरोना) चाचणी करण्या संदर्भात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी साकारात्मक निर्णय घेऊन राज्य राखीव पोलीस दलातील जवानांच्या कोव्हीड -१९ टेस्ट संदर्भातील अडचण दूर केली. त्यामुळे आता आवश्यकतेनुसार कितीहीवेळा या जवानांना चाचणी करता येणार आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या या सहकार्याबद्द आमदार राहुल कुल यांनी त्यांचे आभारही मानले आहेत.