दौंड : सहकारनामा ऑनलाईन
दौंड तालुक्यातील खुटबाव येथे एका युवकाला कोरोनाची बाधा झाली असून हा युवक मालवाहतूक वाहनावर काम करत असल्याने त्याच्या संपर्कामध्ये आलेल्यांमध्ये टेंशन वाढले आहे.
या युवकाचे वय अवघे पंचवीस वर्ष असल्याची माहिती मिळत असून ड्रायव्हर म्हणून वाहनांवर काम करत होता. या युवकाला कोरोनाची लागण झाली असल्याच्या वृत्ताला दौंड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अशोक रासगे यांनी दुजोरा दिला आहे.
हा युवक मालवाहतूक गाडीवर काम करत असल्याने त्याचा अनेकांशी संपर्क आलेला आहे त्यामुळे त्याच्या संपर्कामध्ये असलेल्यांचीही आता कोरोना टेस्ट करण्यात येणार असल्याने अनेकांना काळजीने ग्रासले आहे.