Categories: Previos News

विविध मागण्यांसंदर्भात आशा सेविकांनी घेतली आ.कुल यांची भेट



दौंड : सहकारनामा ऑनलाईन(अब्बास शेख)

दौंड तालुका आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या पदाधिकारी भगिनींनी आज दौंडचे आमदार राहुल कुल यांची भेट घेऊन त्यांच्या विविध मागण्याच्या संदर्भात निवेदन दिले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आशा भगिनी स्थानिक पातळीवर प्रशासनाबरोबर उत्तम काम करत आहेत. यापूर्वी आशा सेविकांना शासनाने संरक्षण देऊन त्यांच्या हाताला कायमस्वरूपी काम द्यावे अशी मागणी आमदार कुल यांनी विधानसभेच्या मार्च २०२० च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती तसेच कोरोनाच्या काळात सर्वेक्षणाचे काम करीत असणाऱ्या आशा भगिनींना वाढीव मानधन व आरोग्य विमा कवच देण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचेकडे पत्राद्वारे केली आहे. या निवेदनानंतर आशा सेविकांच्या विविध समस्या समजावून घेत या भगिनींच्या प्रलंबित मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन आ.कुल यांनी दिले.

Sahkarnama

Recent Posts

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

13 तास ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

2 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

3 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

3 दिवस ago