मुख्यमंत्र्यांचा मार्ग झाला मोकळा! राजकीय अस्थिरता संपुष्टात



मुंबई : सहकारनामा ऑनलाईन

राज्यामध्ये अश्यावेळी राजकीय अस्थिरता निर्माण झाली ज्यावेळी संपूर्ण देशाला कोरोना पासून दूर ठेवण्यासाठी लॉकडाउन सारखा निर्णय घेण्यात आला. पण आता यावर तोडगा निघाला असून निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या मागणीचा विचार करत राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी विधान परिषदेच्या नऊ रिक्त जागांसाठी निवडणूक घेण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली होती. त्यामुळे आता विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक घेण्याची परवानगी निवडणूक आयोगाने दिली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मार्ग मोकळा झाला असल्याचे राजकीय जाणकार मत व्यक्त करत आहेत. निवडणूक आयोगाने २७ मे च्या अगोदर निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाची शुक्रवारी बैठक पार पडली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून २१ दिवसांनी विधानपरिषद निवडणूक पार पडणार असल्याचं निश्चित झालं आहे.