दौंड नगरपालिकेत कोरोनाची एन्ट्री, कर्मचाऱ्यांसह १४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह



     

दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)

करोना महामारी ने दौंड शहरा वरील आपला विळखा आणखिन घट्ट केला अस ल्याचे चित्र पहायला मिळत आहे. 

दौंड नगरपालिकेतील कर्मचाऱ्या सहित शहरातील १४ जनांचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे.

करोना  बाधित  रुग्णांच्या संपर्कात आलेल्या शहरातील  व बाहेर गावावरून आपले कर्तव्य बजावून आलेल्या  राज्य राखीव पोलीस दलातील(गट क्र.७) जवानांचे स्त्राव दि.२२रोजी तपासणी साठी प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. १३१ संशयितांची तपासणी करण्यात आली  त्यापैकी १०पुरूष व ४ महिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाचे डॉ. संग्राम डांगे यांनी दिली आहे. 

शहरातील भीमनगर, शालिमार चौक, गोवा गल्ली, पंचशील टॉकीज, नवगिरे वस्ती, संस्कार नगर, समता नगर तसेच सरपंच वस्ती या परिसरातील रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. शहरातील महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय नगरपालिका पोलीस प्रशासन प्रयत्न  करीत आहे, मात्र काही बेजबाबदार लोकांमुळे संसर्गाची  साखळी वाढते आहे.

बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या या व्यक्तींनी स्वतःहून पुढे येत आपली तपासणी करून घेतली पाहिजे. परंतु करोना होण्याच्या भीतीने काही  लोक बाधितांच्या संपर्कात आले असताना सुद्धा स्वतःची तपासणी करून घेत नाहीत, व  वेळ मारून नेतात. परंतु नंतर त्यांना त्रास सुरू झाल्यावर पळापळ करतात आणि तपासणी नंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला असतो. योग्य वेळी तपासणी न केल्याने त्यांची लागण तोपर्यंत इतरांना झालेली असते. अशा प्रकारांमुळे दौंड शहरातील करोना ची साखळी तुटणारच नाही व रोज नवीन बाधित रुग्णांची संख्या वाढतच राहील. ही शहरातील वस्तुस्थिती आहे. अशा प्रकारांवर प्रशासनाने उपाय शोधण्याची ची आवश्यकता आहे.