तालुक्यातील शेवटच्या गावापर्यंत नदीचे पाणी पोहचविण्यात यश : आ.राहुल कुल यांची माहिती



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

दौंड तालुक्यातील शेवटच्या गावापर्यंत नदीचे पाणी पोहचविण्यात यश आले आहे अशी माहिती दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी दिली. दौंड तालुक्यामधील भीमा नदीवरील शेवटच्या (टेल) भागातील पेडगाव, देऊळगाव राजे तसेच खोरवडी येथील कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे काही प्रमाणात कोरडे पडले होते त्यामुळे नदीकाठच्या अनेक गावांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होत नव्हते. आमदार राहुल कुल यांनी नदीकाठच्या शेतकऱ्यांची ही गरज लक्षात घेत गंभीर दखल घेऊन जलसंपदा विभागाचे अधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. तसेच स्थानिक जलसंपदा अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नदीच्या पाण्याचे योग्य नियोजन केले व भामा आसखेड धरणातून सोडलेले पाणी तालुक्यातील शेवटचा  कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा असणाऱ्या पेडगाव येथे पोहचले आहे. वरील सर्व बंधाऱ्यांमध्ये उन्हाळ्यामध्ये एक ते दीड महिना पुरेल एवढा पाणीसाठा झाला असून शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. या भागातील विद्युत प्रवाह खंडित केला जावू नये यासाठी आमदार कुल महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून  असल्याचे त्यांनी सांगितले.